Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

बिबट्याचे बछडे आढळून आल्याने खळबळ

Share

ओझे | (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यातील खेडले येथे आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास बिबट्याचे बछडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याठिकाणी असलेल्या बिबट्याचा पिंजरा व कॅमेरा लाऊन बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

अधिक माहिती अशी की, येथील बंडूनाना देशमुख यांच्या वस्ती शेजारी बिबटयाचे बचडे आढळून आले. देशमुख यांनी त्वरित या बचडयाला पकडून प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवले. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाचे अधिकारी लवकरच याठिकाणी भेट देणार आहेत.

दरम्यान, बिबट्याचे पिल्लू याठिकाणी आढळून आल्यामुळे बिबटयाची मादी याठिकाणी येणार त्यामुळे त्वरित पिंजरा लाऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!