हरसूलमध्ये बिबट्या जेरबंद

0
हरसूल | गेल्या आठवडाभरापासून हरसूल परिसरातील महादेवनगर, सारस्ते, जातेगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत परिसरात विविध ठिकाणी बिबट्याने १२ बकऱ्यांसह, गाय व वासरावर हल्ला चढवीत परिसरात मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण पसरले होते. 

मात्र परिसरातील सैराट झालेल्या बिबट्याला हरसूल वनविभाग कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने जेरबंद करण्यास यश आले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

हरसूल परिसरात बिबट्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत ग्रामस्थांना शेतात जाण्यासाठी सळो- कि पळो करून सोडले होते. गेल्या आठवड्यात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात असलेल्या गाय, वासरू व १२ बकऱ्यावर हल्ला चढविला होता.

बिबट्याच्या दहशतीने शिवसेना विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख मिथुन राऊत व पदाधिकारी तसेच ग्रामस्थांच्या मागणीवरून परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली होती.

शनिवारी परिसरातील सारस्ते शिवारात पिंजरा लावला व आज सकाळी सातच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाग कर्मचाऱ्यांना यश आले. 

LEAVE A REPLY

*