Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : बिबट्या जेरबंद; बघ्यांची गर्दी नेहमीच ठरते अडथळा

Share

डुबेरे । वार्ताहर

सिन्नर नगर परिषदेचे गटनेते हेमंत वाजे यांच्या बेलांबा भागात असलेल्या शेतात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी (दि.29) रात्री 11 वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. या बिबट्याला बघण्यासाठी शहर व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

सिन्नर-डुबेरे मार्गावरील बेलांबा शिवारात गेल्या दहा-बारा दिवसांपासून बिबट्याच्या मादीसह दोन-तीन बछडे फिरताना अनेक शेतकऱ्यांना दिसले. या बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

वनविभागाला बिबट्यांची माहिती दिल्यानंतर हेमंत वाजे यांच्या आवळ्याच्या बागेत वनविभागाने गेल्या दोन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात दोन-तीन कोंबड्याही ठेवण्यात आल्या होत्या.

गुरुवारी रात्री बिबट्याचं 8 ते 9 महिन्याचे बछडं या पिंजऱ्यात जेरबंद झाले. पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी पसरल्यानंतर सकाळी बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी झाली होती.

बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे, वनरक्षक शरद थोरात, कोंडाजी एकर, पोपट बिन्नर यांच्यासह रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सदर बिबट्या ताब्यात घेत त्याला मोहदरी घाटातील सामाजिक वनीकरणात ठेवण्यात आले आहे.

अजूनही बिबट्यांचा वावर

बेलांबा भागात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एकच बछडा अडकला असून अजून मादीसह 2-3 बछड्यांचा वावरत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसर दहशतीखाली असून या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाकडून आज पुन्हा एक पिंजरा लावण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!