Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

चापडगावात बिबट्या जेरबंद; सुटकेचा निश्वास

Share
चापडगाव | वार्ताहर
चापडगाव शिवारात आज  (दि.4) सकाळी 6 वाजेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्यययाच्या संचारामुळे दहशत पसरली होती.
तो जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी कुंदेवाडी शिवारात एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. गेल्या तीन दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

काही दिवसांपासून चापडगाव शिवारात सांगळे मळा बिबट्याचे दर्शन होत असल्याने दहशत पसरली होती. यामुळे सांगळे मळ्यात सरपंच दत्तात्रय सांगळे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता.

सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणला. तेव्हा सरपंच सांगळे यांना पिंजर्‍यात अडकलेला बिबट्या दिसला. त्यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना याबाबतची माहिती दिली.

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत आव्हाड, जगन जाधव, तुकाराम मेंगाळ, रामनाथ आगिवले, भगवान जाधव, रोहित लोणारे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जेरबंद बिबट्यासह पिंजरा ताब्यात घेतला.

नर जातीचा अंदाजे 6 ते 7 वर्षे वयाचा हा बिबट्या असल्याचे वनाधिकार्‍यांनी सांगितले. मोहदरी वनउद्यानात या बिबट्याची रवानगी करण्यात आली. या भागात आणखी एका बिबट्याचा वावर असून पिंजरा पुन्हा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!