Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : चाडेगाव शिवारात बिबट्या जेरबंद

Share

नाशिकरोड | प्रतिनिधी

नाशिक मनपा हद्दीतील चाडेगाव शिवारात मुक्त संचार असलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

येथील निशांत वाघ यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी याठिकाणी भक्ष्य ठेवण्यात आले होते.

अखेर बुधवारी पहाटेच्या सुमारास पिंजरयात बिबट्या जेरबंद झाला.  मात्र वनविभागाचे कर्मचारी येई पर्यंत बिबट्याला बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी केल्याने काहीसा गोंधळ झाला होता.

सेल्फीचा मोह काही आवरेना 

बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर वनविभागास माहिती देण्यात आली. दरम्यान, अनेकाननी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद असताना सेल्फी काढले. कुठे सेल्फी घ्यावे..कुठे टाळावेत हे माहिती असतानाही नाहक गर्दी करून बिबट्याला यावेळी बघ्यांनी नाहक त्रास दिला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!