सिन्नरला बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेसह दोघे जखमी

0

सिन्नर : भोकणी शिवारात डावखर वस्तीजवळ आज सकाळी 8 वाजता बिबट्याने खडी फोडणाऱ्या दोन्ही मजुरांसह सहा वर्षांच्या बालिकेवर हल्ला करून तिघांना जखमी केले.

जखमींवर दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अजूनही बिबट्या चाऱ्याच्या खाली लपला असल्याचा संशय वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

खंबाळेतील भोकणीत मऱ्हळ रस्त्यावर भगवान सानप यांची वस्ती आहे. या हल्ल्यातील जखमी दयाराम नवले (वय ४०) भाऊसाहेब पोपट डावखर (वय ४७) व कोमल डावखर (वय ६) हे जखमी झाले आहेत.

रस्त्यालगत खडी फोडण्याचे काम करत असताना बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.

घटनेची गांभीर्यता लक्षात घेत वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून सानप वस्तीजवळ पिंजरा लावण्यात आला आहे.

हल्ल्यातील जखमी दयाराम नवले यांच्यावर दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून कोमलला प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

*