देवळाली कॅम्प परिसरात बिबट्याने केले दोन वासरू फस्त; परिसरात घबराटीचे वातावरण

0
देवळाली कॅम्प | येथील शेवंगेदारना येथे बिबट्याने दोन वासरे फस्त केल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

भारत ढोकने यांच्या घराजवळ मध्यरात्री ही घटना घडला. गेल्या महिनाभरापासून येथे बिबट्याचा वावर असल्याचे परिसरातील रहिवासी सांगतात.

परिसरात बिबट्याने गेल्या महिन्यापासून धूम ठोकली आहे. उसाच्या रानात अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. पंधरवड्यात सुनील पाळदे, ज्ञानेश्वर पालदे यांचे वासरे फस्त केल्याची घटना घडली होती.

घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी आज दुपारी याठिकाणी भेट देणार होते. दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील रहिवास्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*