Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देवळा : वाजगावात बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू; परिसर दहशतीखाली

Share

वाजगाव l वार्ताहर

देवळा तालुक्यातील वाजगाव येथील कोलतेशिवारातील शेतकरी दत्तात्रेय गमाजी शिंदे यांच्या गायीवर बिबट्याने रात्री हल्ला केला व या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला असून परिसर बिबट्याच्या दहशतीखाली आहे.

मिळालेली माही अशी की, वाजगाव येथील येथे कोलतेशिवारात शेतात वास्तव्यास राहत असलेले शेतकरी दत्तात्रेय गमाजी शिंदे यांच्या घराजवळ रविवार रात्री ८ वाजता बिबट्याने गायींवर हल्ला केला, यावेळी गायी हंबरडा फोडायला लागल्या.

याच वेळी शिंदे घरातुन बाहेर निघाले व गायी हांबरडा का फोडताय पाहण्यासाठी घराच्या पाठीमागे बांधलेल्या गायींकडे गेले. गोठ्यातील एक गाय दिसत नसल्याने त्यांनी घरच्या आजू बाजूच्या परिसरात पाहिले पण रात्रीचा अंधार आल्याने काही दिसले नाही.

गायींच्या आवाज एकूण परिसरातील शेतकऱ्यांनी शिंदे यांच्या घराकडे धाव घेतली व जवळच असलेल्या डोंगराकडे बॅटरीच्या प्रकाशात सर्वाना गायी फस्त करताना बिबट्या दिसला.

याबाबत घटनेची माहिती अशी की, पोलीस पाटील निशा देवरे व सरपंच प्रकाश मोहन यांना देण्यात आली देवरे यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्याना देण्यात आली.

मृत गायीचा पंचनामा करून शेतकऱ्याला लवकरच नुकसानभरपाई दिली देण्यात येईल अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी ए.एन.शेख यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!