Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

विंचूर दळवीत बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा फडशा

Share

विंचुरी दळवी | वार्ताहर

विंचुरी दळवी येथील चंद्रे वस्तीवर येथे आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबटयाने केलेल्या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

येथील नंदू दत्तात्रेय कळमकर यांचा चंद्रे मळयात जनावरांचा गोठा आहे. कळमकर नेहमीप्रमाणे एक गाय व दोन वासरांना सायंकाळी चारा – पाणी करून घरी आले होते.

पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक भक्ष्याच्या शोधार्थ आलेल्या बिबट्याने चंद्रे मळयात गोठयाची भिंत पाडून वासरावर हल्ला केला.  हे बघून शेजारी बांधलेल्या जनावरांनी हंबरडा फोडला.

त्यानंतर कळमकर यांचे शेजारी विलास मानाजी चंद्रे यांनी गोठयाकडे धाव घेतली. आरडाओरड बघून बिंबटयाने धुम ठोकली खरी पण बिबट्याच्या  हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला आहे.

वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली . त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!