Friday, May 3, 2024
Homeराजकीयअमरिशभाई पटेल व अभिजीत पाटील यांच्यात लढत

अमरिशभाई पटेल व अभिजीत पाटील यांच्यात लढत

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे.

- Advertisement -

त्यानुसार दि. 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

देशात कोरोना विषाणूमुळे होत असलेल्या संसर्गाचा प्रसार रोखणे, गर्दीची शक्यता टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची उर्वरित निवडणूक प्रक्रिया पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

भारत निवडणूक आयोगाच्या आजच्या अधिसूचनेअन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीचा उर्वरित कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

मतदान दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान घेण्यात येईल. मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी होईल. उमेदवार, मतदार, जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकार्‍यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. यादव यांनी केले आहे.

सरळ लढत

काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी मंत्री तथा विधान परिषदेचे विद्यमान सदस्य अमरिशभाई पटेल यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही निवडणूक जाहीर झाली आहे.

यासाठी श्री. पटेल यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील अभिजीत मोतीराम पाटील यांनी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी दाखल केली आहे.

यापुर्वी दाखल केलेले अर्ज ग्राह्य धरुन ही निवडून होत आहे. या ठिकाणी सरळ लढत होत असून बदलेल्या राजकीय समीकरणामुळे याकडे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या