Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विधानसभेचे कामकाज सुरु; नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात

Share

मुंबई | प्रतिनिधी

मी ….विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने…ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे…अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगीन…भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन…आणि आता मी जे कर्तव्य हाती घेणार आहेत ते मी निष्ठापूर्वक पार पाडीन.

असे म्हणत आज विधानसभेच्या आमदारांचा शपथविधी पार पडत आहे. हळूहळू सर्वच पक्षांचे आमदार याठिकाणी दाखल होत असून हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देत आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा असलेल्या महाशिवआघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली.

उद्या (दि.२८) सायंकाळी साडेपाच च्या सुमारास उद्धव ठाकरे शिवाजी पार्क (शिवर येत्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतीर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!