Type to search

मुख्य बातम्या राजकीय

ममतांवरआरोप केल्या प्रकरणी अमित शहांना मानहानीची नोटीस

Share
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि तृणमूल काँग्रेस सरकार यांच्यात संघर्ष सुरूच आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीतील वाहनांची तोडफोड केल्‍याची घटना समोर आली आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केल्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मानहानीची नोटीस बजावली आहे.

अमित शहा यांनी मंगळवारी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसवर टीका केली होती. चिटफंड कंपन्यांच्या मालकांनी बॅनर्जी यांच्या पेंटिंग कोट्यवधी रुपयांना खरेदी केल्या, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसनंही शहांवर पलटवार केला. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आरोग्य मंत्री चंद्रीमा भट्टाचार्य यांनी शहा यांना मानहानीची नोटिस पाठवली आहे.

शहा हे खोटे बोलत असून, त्यांनी ममतांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. ममतांविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्यामुळं शहांना मानहानीची नोटिस पाठवली आहे, असं भट्टाचार्य यांनी सांगितलं. शहा यांनी कशाच्या आधारे ममतांवर आरोप केले? जे आरोप केले, त्याबाबतचे पुरावे सादर करावेत किंवा शहांनी जाहीर माफी मागावी; अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू, असा इशाराही त्यांनी दिला.

पश्‍चिम बंगालमध्ये रथयात्रेच्या परवानगीवरून रणकंदन सुरूच आहे. भाजपची रथयात्रा निघाली तर आपल्या सरकारची अंत्ययात्रा निघेल, याची ममतांना कल्पना आहे. त्यामुळेच त्यांनी घाबरून रथयात्रेला विरोध केल्याचा आरोप  अमित शहा यांनी याआधी केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!