एलईडी खरेदी प्रकरणी चौकशीचेे आदेश

0

नाशिक । येवला शहरात नव्याने बसवण्यात येत असलेल्या एलईडी खरेदीत 22 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून दोन हजार रुपयांना मिळणारा एलईडी प्रत्यक्षात किंमत 11 हजार 700 रुपयांना लावण्यात आला आहे.

असा आरोप करत आज विरोधकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची भेट घेत त्यांना भ्रष्टाचाराचे पुरावे दिले. त्यानंतर जिल्हाधिकारयांनी या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकायांना देत तीन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

येवला शहरात एल.ई.डी. पथदीप बसवण्याचे काम सुरू असून चायना मेड स्वरूपाचे अंत्यत हलके एल.ई.डी. बसवून सुमारे 22 लाखाचा पालिकेत भ्रष्टाचार करण्यात आला आहे असा आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रसेसह शिवसेना व अपक्ष नगरसेवकांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, हे पथदीप चायना मेड असून, अंत्यत हलक्या प्रतिचे आहेत. दोन हजार रुपयांना मिळणार्‍या एका एलईडीसाठी 11 हजार 700 रुपये अदा करण्यात आले आहेत. या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यासर्व प्रकाराबाबत जिल्हाधिकारयांनी येवला नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोटीस काढत या सर्व खरेदी व्यव्हाराचे चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. पुढील 3 दिवसात याची चौकशी करुन त्याचा लेखी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा असे म्हटले आहे.

यावेळी राष्टलवादी कॉग्रेसचे गटनेते डॉ.संकेत शिंदे, शिवसेनेचे गटनेते दयानंद जावळे,अपक्ष गटनेते रुपेश लोणारी आणि नगरसेवक उपस्थित होते

LEAVE A REPLY

*