Type to search

Featured ब्लॉग शैक्षणिक

परदेशी भाषा शिका

Share
परदेशी भाषा शिका, Learning Foreign Language Career Option

आजच्या जगात केवळ इंग्रजी भाषा येणे एवढेच पुरेसे नाही. दररोज नवनवीन शिकण्याची उर्मी बाळगणारा व्यक्तीच पुढे जावू शकतो. जगातील नवनवीन तंत्रज्ञान अवगत करताना नवीन भाषाही शिकण्यावर जोर देणे गरजेचे आहे. नवीन भाषा शिकल्यास संवादातील संभाव्य अडथळे दूर होऊ शकतात आणि आपल्यातील कौशल्य आणखी विकसित होऊ शकतात. शाळा आणि कॉलेजमध्ये ठराविक भाषा शिकवली जाते. तसेच कॉलेजमध्ये परकी भाषा शिकण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतो.

वेळ सत्कारणी लावा : आपण घरात किती वेळ असतो, याचा जरा विचार करा. घराबाहेर पडल्यानंतर शाळा, कॉलेज, खासगी क्लास, खेळणे यातून राहिलेल्या वेळेचा आपण सदूपयोग करू शकतो. दररोज दोन ते तीन तास आपण वेगळे शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी खासगी क्लासेस लावणेच गरजेचे आहे, असे नाही. तर ऑनलाईनवर अनेक अभ्यासक्रम उपलब्ध असून ते आपल्याला करियरसाठी उपयुक्त ठरू शकतात. परकी भाषा शिक्षण अभ्यासक्रमाची निवड करून आपण नवीन विचार शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

स्वत:ची भाषा विकसित करा : जर तुम्ही एखादा भाषा अभ्यासक्रमाचा क्लास लावला असेल तर तेथील मित्रांशी आपण कोड भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला का. नसेल केला तर प्रयत्न करून पाहा. आपली भाषा सभोवताली असणार्‍या मंडळींना समजणार नाही. ती भाषा मित्रांतच गुप्त राहू शकते. तुम्ही काय बोलतात हे बाकिच्यांना समजत नसल्याने ते तुमच्या संवांदात हस्तक्षेप करणार नाहीत. मित्रांना गुप्त संदेश पाठविणे, सांकेतिक भाषेमध्ये बोलणे यामुळे संवादाची प्रक्रिया अधिक निकोप होते.

चाकोरीबाहेर या : सकाळी कॉलेजला जाणे, दुपारी जेवण, सायंकाळी ग्राऊंडवर आणि रात्री अभ्यास हा झाला विद्यार्थ्याचा दिनक्रम. विकएंडला पालकासमवेत बाहेर फिरायला जाणे ही बाब थोडी दिलासादायक ठरू शकते. परंतु त्याचाही अतिरेक झाला की कंटाळा यायला लागतो. घरातच बसून राहवेसे वाटते. सुटीच्या दिवशी टिव्ही किंवा सिनेमा पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी वेगळे शिक्षण घेण्याचा विचार करावा. परकी भाषा शिक्षण हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चाकोरीबाहेरचे जीवन जाणून घेण्यासाठी हा अभ्यासक्रम आपल्याला मदत करू शकतो.

करियरला पोषक : परकी भाषेच्या माध्यमातून आजकाल करियरसाठी अनेक पर्याय खुले आहेत. भाषांतरकार, शिक्षक , दुतावासात नोकरी यासारख्या ठिकाणी आपल्याला करियर करता येऊ शकते. योगायोगाने परदेशात शिक्षणासाठी जाण्याची वेळ आली आणि त्या देशाची भाषा आपल्याला अवगत असेल तर शिक्षण घेताना अनेक अडथळे कमी होऊ शकतात. आपल्या सीव्हीमध्ये परकी भाषेचा कॉलम कंपनीवर प्रभाव पाडणारा ठरू शकतो. अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना परदेशात प्रशिक्षणासाठी, नोकरीसाठी पाठवत असतात. आपल्याला जर परकीय भाषा माहित असेल तर कंपन्या अशा कर्मचार्‍यांना, अधिकार्‍यांना झुकते माप देतात. पारंपारिक अभ्यासक्रमाशिवाय भाषाविषयकचा अभ्यासक्रम पूर्ण करून आपण करियरचा पाया अधिक मजबूत करू शकतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!