Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गॅसची गळतीच्या तक्रारींनी मुंबईत घबराट

Share

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईच्या पूर्व उपनगरात तसेच पश्चिम उपनगरात काही ठिकाणी गुरुवारी रात्री उशिरा गॅसची गळती झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे.

मुंबईतील मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून स्थानिक नागरिक अग्निशमन विभागाकडे तक्रारीसाठी संपर्क साधत आहेत.

एकूण 29 तक्रारींची नोंद महापालिकेकडे केली आहे. गॅस गळती नेमकी कुठे सुरु आहे याबाबाबत कुठलीही माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही.

मुंबईत गॅस गळतीच्या, गॅसचा वास येत असल्याचा तक्रारी रात्री नागरिक करत होते. पोलीस,अग्निशमन दल तसेच विविध गॅस कंपन्यांचे अधिकारी तपास करत होते पण कुठेही काहीही आढळून आले आहेत.

पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक ठिकाणाहून गॅस गळतीच्या तक्रारी आल्याने अग्निशमन दलाने अनेक ठिकाणी गाड्या पाठवल्या. तसेच अन्य यंत्रणांना देखील अलर्ट केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!