‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या प्रयत्नातून ३३ नद्यातून वाहिले पाणी

0
बंगलोर | आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात दोन दिवसीय ‘नदी पुनरुज्जीवन प्रकल्प’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी नुकतेच या संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, देशातील जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी नागरी सामाजिक संस्थांचा त्यात सहभाग असण्याची गरज आहे. हे फक्त सरकारचे काम नाही. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नागरी संस्था, धार्मिक व कॉर्पोरेट संस्था यांनी  सर्वांनी एकत्र येऊन हा पाण्याचा प्रश्न सोडवायला हवा.

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज’सह आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या परिषदेत देशातील ज्वलंत पाणी समस्येवर शाश्वत आणि समावेशक उपाय शोधण्यासाठी चालू असलेल्या राष्ट्रीय चळवळीला पुढे नेण्यासाठी जगभरातील मान्यवर उपस्थित होते.

या परिषदेत देशातील विविध ठिकाणांहून आलेले ३५० हून अधिक शास्त्रज्ञ, जलतज्ञ, जल संसाधन अभियंते, धोरणी, शेतकरी गट, भूगर्भशास्त्रज्ञ, रिमोट सेन्सिंग डेटा अॅप्लिकेशन शास्त्रज्ञ, बहुदाविषयक तज्ज्ञ, संशोधक, उत्साही आणि कार्यकर्ते या परिषदेत सहभागी झाले आहेत.

आर्ट ऑफ लिव्हिंगने पुनरुज्जीवित केलेल्या ३३ नद्या आणि त्यांच्या उपनद्यांच्या कामाचे कौतुक करत ISRO चे अध्यक्ष किरण कुमार म्हणाले, ‘शाश्वत जीवन हा आमचा वारसा आहे. गुरुदेवांनी सुरु केलेल्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कामामुळे भविष्यात पिण्यासाठी, शेतीसाठी आणि इतर कामांसाठी पाणी उपलब्ध असणार आहे.’ नदीच्या कामासाठी ISRO कडून यापुढेही मदत मिळत रहाण्याची त्यांनी शाश्वती दिली.

मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड, वाळूची खाण, मातीची धूप आणि जमिनीचा अति वापर यामुळे नद्या आणि शेकडो, हजारो पाण्याचे स्रोत कोरड्या पडत आहेत.

या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे आर्ट ऑफ लिव्हिंगने युद्धपातळीवर नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य सध्या ३३ नद्या, उपनद्या आणि पाण्याच्या हजारो स्रोतांवर चालू आहे. लक्षावधी शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला याचा फायदा करून देण्याचे ध्येय आहे.

नदी पुनरुज्जीवनाच्या मॉडेलचा नद्यांवर होणारा सामाजिक-आर्थिक परिणाम यावरील अभ्यासातून हे दिसून आले आहे की या कार्याचे सुपरिणाम मूलभूत स्तरावर प्रचंड प्रमाणावर दिसू लागले आहेत. याचा फायदा झालेले काही जण तेथे उपस्थित होते त्यांनी हेच सांगितले.

महाराष्ट्रातील बऱ्याच प्रमाणात आत्महत्या होत असलेल्या कळसपूर येथील, लोकसहभागातून झालेल्या नदीच्या पुनरुज्जीवनाचा फायदा घेतला जात आहे. यावेळी दयानंद हे शेतकरी म्हणाले की, मागील ८ वर्षात पाणी अजिबात नव्हते. शेती ही फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती त्यामुळे मी एका वर्षात फक्त एकच पीक घेत होतो.

आता वर्षभर पाणी उपलब्ध असते त्यामुळे मी तीन तीन पीके घेऊ शकतो. पूर्वी मी ३० ते ४० हजार रुपये कमवत असे. आता ३ लाखापर्यंत कमावतो.

एक चांगला पायंडा पाडणाऱ्या या कार्यक्रमात जे तज्ञ उपस्थित राहिले होते त्यात, प्रो. रोजर फाकनर, स्कूल ऑफ इंजीनियरिंग, कार्डिफ विश्वविद्यालय, अशोक दलवई, अतिरिक्त सचिव, भारत सरकार, सुश्री अपराजिता सारंगी, संयुक्त सचिव, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

*