Type to search

Featured सार्वमत

शेखच्या मावा फॅक्टरीवर रेड

Share

काटवन खंडोबा भागात एलसीबीची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – तंबाखूजन्य पदार्थ अर्थात मावा विक्रीला राज्यात बंदी असली तरी खुलेआम त्याची विक्री सुरू आहे. काहींनी तर फॅक्टरी टाकून राज्यभरात नेटवर्क तयार करत ‘कमाई’ सुरू केली आहे. ‘नगर टाइम्स’ने 31 मे रोजी त्याचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर आठवडाभराने पोलिसांनी रेड करत अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अजूनही शहरात अनेक मावा फॅक्टरी असून त्यावरही कारवाई करणे अपेक्षित असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

महारूफ अजीज शेख या मावाकिंगला एलसीबीने टाकलेल्या रेडमध्ये गजाआड केले. त्याच्याकडून 1 हजार 120 किलो बारीक सुपारी, सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करण्यासाठी लागणारी मशिनरी असा 2 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. काटवन खंडोबा येथील राहत्या घरातच त्याने मावा फॅक्टरी सुरू केली होती. मावा तयार करून तो विकणे राज्यात बंदी असतानाही त्याने हा ‘उद्योग’ सुरू केला असल्याची माहिती एलसीबीने पीआय दिलीप पवार यांना मिळाली. त्यांनी पथकाला रेड टाकण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचा पर्दाफाश झाला. अन्न व औषध प्रशासन विभागाची मदतही पोलिसांनी घेतली. ‘नगर टाइम्स’ने 31 मे रोजीच्या अंकात ‘ए भावा, दे मावा’ हे वृत्त प्रकाशित करून नगरमध्ये बेकायदा मावा विक्रीवर प्रकाश टाकला होता. पोलिसांनी दहा दिवसानंतर त्यावर छापा टाकत रेड सक्सेस केली.

ये तो सिर्फ झाँकी…
नगर शहरात रामचंद्र खुंट, मुकुंदनगर, बालिकाश्रम रस्ता यासह अनेक ठिकाणी मावा तयार करणार्‍या फॅक्टरी आहेत. मावा तयार करताना त्यात मानवी शरीराला घातक असे रसायन मिक्स केले जाते. नगरचा मावा थेट राज्यभर वितरीत करून मोठी ‘कमाई’ सुरू आहे. पोलिसांनी एका फॅक्टरीवर छापा टाकला असला तरी अजून अनेक फॅक्टरी नगरात आहेत. त्यावर कारवाई करावी असा सूर अनेकांनी ‘नगर टाइम्स’शी बोलताना आळवला. मावा फॅक्टरी चालविणार्‍यांचे पोलिसांशी लागेबांधे आहेत, त्यामुळे कारवाई होत नाही, असा आरोप आहे. तो आरोप खोडून काढून कारवाईची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागणार आहे. त्याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!