खुशखबर : केवळ ४ हजारात LAVA चा स्वस्त स्मार्टफोन

0
नवी दिल्ली – मोबिल कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरु आहे. कमी किंमतीत दर्जेदार फीचर्स देण्याची धावपळ मोबाईल कंपन्यांमध्ये दिसते आहे. नुकताच ‘LAVA Z60s’ हा नवीन स्मार्टफोन लावा इंटरनॅशनल कंपनीकडून मार्केट दाखल करण्यात आला आहे. हा फोन ग्राहकांना केवळ ४ हजार ९६० रुपये  एवढ्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. आतापर्यंतचा कंपनीचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

या फोनच्या फीचर्स बाबत आपण जाणून घेऊ. या फोनमध्ये ५ इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. १ जीबी रॅम आणि १६ जीबी इन्टर्नल स्टोरेजसह १.५ गिगाहर्ट्झ क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये अॅन्ड्रॉईड ८.१ ओरिओ (Go Edition) आणि २५०० एमएएच बॅटरी चालते. ५ मेगापिक्सल ऑटो-फोकस रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा ‘Z60s’ फोनमध्ये आहे.

या फोनबाबत लावा इंटरनॅशनल कंपनीचे गौरव निगम यांनी सांगितले, की ग्राहकांकडून आम्ही वेळोवेळी अभिप्राय घेऊन हा फोन तयार केला असल्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस हा फोन नक्कीच उतरेल. रिलाईन्स जिओसोबत कंपनीने भागीदारी केली असून ग्राहकांना ४जी स्मार्टफोन सेवेसाठी विशेष कॅश बॅकच्या ऑफर्स दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

*