Monday, April 29, 2024
HomeUncategorizedचाळीसगाव : लवकरच शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ

चाळीसगाव : लवकरच शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ

चाळीसगाव  – 

जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणार्‍या अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यात देखील लवकरच शिवभोजन थाळी योजना सुरु होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती प्राप्त झाली असून एकाच वेळी दोन ठिकाणी शिवभोजनालय सुरु करण्यात येणार असून प्रत्येक केंद्रावर 100 थाळीचे वितरण करण्यात येणार आहे. शिवभोजन केंद्रांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले असून आतापर्यंत चार अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची छाननी केल्यानतंर दोन ते तीन दिवसात शिवभोजन थाळी सुरु करण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे शिवभोजन थाळी होय. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणार्‍या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध केली. तसेच कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये ही योजना जळगाव जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि निराश्रित यांच्यासाठी वरदान म्हणून सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या काळात शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपयांवरून आता केवळ 5 रुपये केली आहे.

तसेच शिवभोजन केंद्राची वेळही सकाळी 11 ते दुपारी 3 अशी वाढविण्यात आली आहे. यामुळे अल्प मिळकत असणार्‍यांसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे. जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यांमध्ये आगामी काळात शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ही योजना जळगाव शहरात 9 ठिकाणी सुरू आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात ही योजना राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार चाळीसगाव तालुक्यात हि योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. एकाच वेळी दोन शिवभोजन केंद्र सुरु करण्यात येणार असून प्रत्येक 100 थाळीचे वितरण याठिकाणी फक्त 5 रुपयात करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासाठी प्रशासनाकडून अर्ज इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आतापर्यंत चार अर्ज प्राप्त झाले असून आजची अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अर्जांची छाननी करुन येत्या काही दिवसात शिवभोजन गरजूना प्राप्त होणार आहे.

चाळीसगावात शिवभोजन थाळी योजन सुरु झाल्याने गरजू , गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ याचा लाभ मिळणार आहे. यात एक वाटी वरण, एक वाटी भात, दोन पोळ्या आणि एक वाटी भाजी असे शिवभोजन योजनेचे स्वरूप असणार आहे. एकाच वेळी 200 थाळीचे नियोजन करण्यात आले असून गरज पडल्यास ते अजुन वाढविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या