Type to search

Breaking News Featured मार्केट बझ मुख्य बातम्या

८ हजारात मिळणार Redmi 8; फीचर्स पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Share

दिवाळीतील खरेदीसाठीची बाजारपेठ काबीज करण्यासाठी  Xiaomi कंपनीने भारतात नवा स्मार्टफोन Redmi 8 लाँच केला आहे. हा फोन म्हणजे Redmi 7 मालिकेची पुढील आवृत्ती असून यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे हा स्मार्टफोन अवघ्या आठ हजारात मिळणार आहे.  कंपनीकडून या फोनला कॅमेरा चँपियन असं नाव देण्यात आलं आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला असून स्पश फ्रुफ कॉटिंगसह उपलब्ध करण्यात आला आहे. डिस्प्लेवर सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले अधिक सुरक्षित होणार आहे.

फोनमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज आहे. 3 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 7 हजार 999 रुपये आणि 4 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे.

या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर आहे. ऑरा मिरर, रुबी रेड आणि ऑनिक्स ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!