ग्रेट गोल्डन सर्कसचा शुभारंभ

0
सिन्नर | येथील आडव्या फाट्यावरील मैदानावर ग्रेट गोल्डन सर्कसचा आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच झालेल्या शो मध्ये विविध प्रकारच्या कसरतींनी सिन्नरकरांच्या डोळ्यांची पारणे फेडली.

फायर डान्स, हत्ती, घोडे, कुत्रे, पोपट यासारख्या प्राण्यांचे खेळ देखील सर्वांना आश्यर्च करीत होते. जवळपास महिनाभर रोज ३ खेळ होणार असून याचा लाभ प्रेक्षकांना घेता येईल.

उद्घाटन समारंभास नगराध्यक्ष किरण डगळे, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख, नायब तहसिलदार प्रशांत पाटील, नगरसेवक शैलेश नाईक, पी. जी. आव्हाड उपस्थित होते. सर्कसचे व्यवस्थापक बी. सेतू मोहन यांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

*