Type to search

टेक्नोदूत फिचर्स मार्केट बझ

३ जीबी रँम असलेला सर्वात स्वस्त स्मार्ट फोन भारतात लॉन्च

Share

नाशिक: ३ जीबी रँम असलेला रिअल मी ३ आय (Realme 3 I) हा सर्वात स्वस्त स्मार्ट फोन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्ट फोनमध्ये डूअल रियर कँमेरा सेटअप आहे. प्राइमरी सेंसर १३ मेगापिक्सलचा आहे. हा स्मार्ट फोन २ मेगापिक्सल सेकेंडरी सेंसरवर काम करतो. तसेच फ्रंट पँनलला १३ मेगापिक्सलचा कँमेरादेण्यात आला आहे.

चायना कंपनीचा रियलमीचा नवा बजेट स्मार्टफोनची टक्कर शाओमीच्या रेडमी ७ ए स्मार्ट फोन सोबत असणार आहे. रियलमी ३ आय ड्युअल रियर कँमरा सेटअप, ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर मीडियाटेक हिलीयो पी ६० प्रोसेसर देण्यात आलेले आहे. अन्य स्पेसिफिकेशन्समध्ये ४, २३० एमएएचची बँटरी आणि १३ मेगापिक्सलचा सेल्फी कँमरा देण्यात आला आहे.

रिअलमी ३ आय ची किंमत ७, ९९९ रुपये पासून सुरु होत आहे. या किंमतीत ३ जीबी रँम आणि ३२ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत ९९९९ रुपये असणार आहे. ह्यात ब्लँक, डायमंड ब्ल्यू आणि डायमंड रेड रंग ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत.

रिअलमी ३ आयची विक्री फ्लिपकार्ट आणि रिअलमी ऑनलाइन स्टोरवर पुढील आठवड्यापासून सुरु होईल. पहिला सेल २३ जुलै २०१९ दुपारी १२ वाजेला सुरु होणार आहे.

रिअलमी ३ आयची वैशिष्ट्ये
डुअल-सिम
रियलमी ३ आय अँड्रॉइड ९ पाय(pie) वर आधारित कलरओएस ६ वर चालतो. यामध्ये ६.२ इंचचा एचडी + (७२०x१५२० पिक्सल) डिस्प्ले आहे. तसेच १९:९ अँस्पेक्ट रेशिओ, ८८.३० टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो आणि कॉर्निंग गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शनसह येतो. ह्यात मिडियाटेक हिलिओ पी६० प्रोसेसर आणि ४ जीबी पर्यंत रँम दिली आहे.
रियलमी ३आय मध्ये ड्युअल रिअर कँमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्राइमरी सेंसर १३ मेगापिक्सल चा आहे. याचा अपर्चर एफ/ १.८ आहे.
ह्या सोबत २ मेगापिक्सल सेकेंडरी सेंसरवर काम करेल. फ्रंट पँनल वर १३ मेगापिक्सलचा कँमरा आहे.
रिअर कँमेरा नाइटस्पेस, हाइब्रिड एचडीआर, क्रोमा बोस्ट आणि पोर्ट्रेट मोडला सपोर्ट करतो. फ्रंट कँमरा एआय ब्यूटीफिकेशन, एचडीआर आणि एआय फेस अनलॉक सोबत येतो.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!