पियाजिओ शोरुमचा शुभारंभ

0
नाशिक । पियाजिओ व्हिईकल्स प्रा. लि. ने आपल्या उत्पादनाचा विस्तार करण्यासाठी प्रिमियम वेस्पा आणि स्पोर्टी अप्रिलियासाठी नवीन डिलरशिप शोरुमचा शुभारंभ केला.

त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नलजवळ शिवा मोटर्स शोरुममध्ये  वेस्पा व अप्रिलिया एसआर 150 श्रेणीतील वाहने उपलब्ध आहेत.

वाहन व्यवसायासाठी नाशिकचे मार्केट महत्वपूर्ण असून आमच्या नवीन आमच्या कंपनीच्या वाहनांना येथे चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे पियाजिओ 2 व्हिलर्सचे व्यवसाय प्रमुख आशिष याख्मी यांनी सांगितले.

पियाजिओ सोबत भागीदारी करुन आम्ही अत्यंत आनंदी आहोत या कंपनीच्या अप्रिलिया आणि व्हेस्पासह जागतिक दर्जाची प्रिमिअम वाहने ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

अद्वितीय सेवा आणि ग्राहकांचे समाधान यासाठी आम्ही बांधिल आहोत, सर्वोत्तम सेवा, गुणवत्ता आणि अनुभव या वैशिष्ट्यांवर ही नवीन डिलरशिप अधिकाधिक ग्राहकांपर्यत पोहचवणार आहोत, असे शिवा मोटर्सचे संचालक महेश ठक्कर यांनी  सांगितले. पत्रकार परिषदेला अनिल चंद्रन, केवल सोमय्या, संदिप भेंडाळे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*