Sunday, April 28, 2024
Homeनगरवादग्रस्त व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस् झेडपी कर्मचार्‍याविरोधात गुन्हा

वादग्रस्त व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस् झेडपी कर्मचार्‍याविरोधात गुन्हा

नगर जिल्ह्यातील पहिलीच घटना

अहमदननगर (प्रतिनिधी) –  जातीय तेढ निर्माण करणारे स्टेटस व्हाट्सअपवर ठेवल्याने नगर जिल्हा परिषदेच्या एका कर्मचार्‍याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे रहावे लागले आहे. पोलिसांनी स्वत:हून ही कारवाई केली. जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा नगर शहरात नोंदविला गेला. पीर महंमद बादशाह शेख (रा. शेंडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

शेख हा जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. जातीय तेढ निर्माण होईल, या हेतुने चुकीची अफवा पसरविल्याचा आरोप शेख विरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविला गेला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याने कलम 188 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 52 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 140 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14 मार्च रोजी राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. 18 मार्च रोजी जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढत सोशल मिडियावर अनधिकृत, चुकीची माहिती पसरविण्यास मनाई केली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकार्‍यांनी हे आदेश काढले. तेव्हापासून पोलिसांचा प्रत्येक व्हाट्सअप ग्रुपवर तसेच वैयक्तिक व्हाट्सअपवरही ‘वॉच’ आहे. पोलिसांच्या या डोळ्यात शेख यांनी पोस्ट आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या