Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआता इन्स्टाग्राम स्टेटसला एकावेळी सहा फोटो शेअर करता येणार

आता इन्स्टाग्राम स्टेटसला एकावेळी सहा फोटो शेअर करता येणार

मुंबई : तरुणाईचे आवडते अँप इन्स्टाग्रामला नवीन फिचर अपडेट झाले आहे. यामध्ये आता इन्स्टाग्राम स्टेटसला एकावेळी सहा फोटो शेअर करता येणार आहे. इन्स्टाग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडम मॉसरी यांनी अधिकृत घोषणा केली आहे.

https://twitter.com/mosseri/status/1207076646122995714?s=20

- Advertisement -

देशातील बहुतांश लोक इन्स्टाग्रामचा वापर करत असतात. यामध्ये इन्स्टास्टेटसला एकावेळी दोन किंवा तीन फोटो शेअर करता येत होते. परंतु आता सहा फोटो ठेवता येणार आहेत. याबाबतचे नवे फीचरची घोषणा सीईओनी आपल्या ट्विटर हँडलवरून केली आहे. या फीचरमुळे कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीशिवाय युजर्सना त्यांच्या ‘स्टोरी स्टेटस’मध्ये एकावेळी सहा फोटो शेअर करता येणार आहेत.

तसेच इन्स्टाग्रामनेदेखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरूनही या नव्या फोटो फिचरची माहिती दिली आहे. यामध्ये युजर्सना नवीन फिचर्स समजावून सांगण्यासाठी फोटो ग्रीड फॉरमॅटचा वापर करून काढलेले ६ फोटो शेअरही करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या