Type to search

गर्दी टाळण्यासाठी दुकानापुढे मार्किंग

Share

चासनळी (वार्ताहर) – कोरोना साथीच्या रोगांवर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार गर्दी टाळण्यासाठी कृषी औषधे विक्रेत्यांनी दुकानासमोर प्रत्येक ग्राहकास विशिष्ट अंतर ठेवून औषधे देत असल्यामुळे चर्चेचा विषय होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील परिसरात अवकाळी पावसामुळे डाळिंब द्राक्ष साठी ढगाळ हवामान तयार झाल्यामुळे औषध मारण्याची वेळ आली आहे. अचानक औषधे विक्रेत्याकडे शेतकर्‍यांनी धाव घेतल्यामुळे कृषी औषध दुकानदाराकडे एकदम गर्दी झाल्यामुळे ग्राहकांना दुकानापुढे एक ते दीड मीटर अंतरावर मार्किंग करून उभे राहण्यासाठी सांगत आहे. शेतकरी गर्दी न करता दुकानदारांना सहकार्य करत आहे.

यावेळी कृषी केंद्राचे मालक शेखर चांदगुडे यांनी सांगितले, पैसे नसल्यामुळे औषधे उधार विकण्याची वेळ आली आहे. भविष्यात मालाला भाव मिळेल किंवा नाही याची काही शाश्‍वती नाही. अवकाळी पावसामुळे माल हातात येईल का नाही? याचा भरोसा नाही तरीपण शेतकर्‍यांना औषधे द्यावी लागत आहे. ही तारेवरची कसरत असून यातून सावरण्यासाठी सरकारला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment

error: Content is protected !!