Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

गर्दी कमी करण्यासाठी शहर पोलिसांकडून कडक पाऊले

Share
गर्दी कमी करण्यासाठी शहर पोलिसांकडून कडक पाऊले, Latest News Police Reduce Crowd Action Ahmednagar

शीर्घ कृती दलाच्या जवानाकडून दुचाकीवर गस्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे प्रशासनाकडून वेळोवेळी उपाय योजना करण्यात येत आहे. त्यात नगर शहरात कोरोनाचा तिसरा रूग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. असे असले तरी नगरकर घरात थांबायला तयार नाही. यामुळे शहर पोलिसांनी कठोर पाऊले उचली आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी नगरकरांना घरात बसविण्यासाठी कंबर कसली आहे. 15 पोलीस अधिकारी, दोनशे कर्मचारी, शीर्घ कृती दलाच्या चार तुकड्या, कमांडो पथक असा बंदोबस्त तैनात केला आहे. पिक्स पाँईटवर कर्मचारी कार्यरत असून दिवस-रात्र मेहनत घेत आहे. लोकांना घरात बसविण्यासाठी गस्त सरू आहे.

कोरोना व्हायरसला पिटाळून लावण्यासाठी पंतप्रधानांनी रविवारी जनता कर्फ्युचे आवहान केले. नगरकरांनी जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद दिला. परंतू, सोमवार नंतर मंगळवारी नगरकरांनी रस्तावर एकच गर्दी केली होती. या गर्दीला पिटाळून लावण्यासाठी शहर पोलिसांनी मंगळवारी काहींना प्रसाद दिला. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून रस्तावरील गर्दी कमी करण्यसाठी उपअधीक्षक मिटके यांच्या नेतृत्वाखाली कोतवाली, तोफखाना व भिंगार पोलीस ठाणे हद्दीत 45 पिक्स पाँईट तयार करण्यात आले आहे.

या पिक्स पाँईटवर काही कर्मचारी तैनात केले आहे. येणार्या-जाणार्या नागरिकांना घरात थांबण्यासाठी हे पोलीस काम करत आहे. तर काहीवर व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. मंगळवारी उपअधीक्षक मिटके यांनी शहरात दुचाकी गस्तीचे नियोजन केले होते. शीर्घ कृती दलाच्या कर्मचार्यांनी 40 दुचाकीवरून कोतवाली, तोफखाना व भिंगार पोलीस ठाणे हद्दीतून दिवसभर गस्त घातली. रस्तावर विनाकारण फिरणार्यांना चांगलाच प्रसाद दिला. प्रशासनाकडून घर न सोडण्याचा आदेश असतानाही काही महाभाग विनाकारण रस्तावर येत आहे.

गर्दी कमी करण्यासाठी असा बंदोबस्त-
कोतवाली हद्दीत 6 अधिकारी व 67 कर्मचारी, तोफखाना हद्दीत 5 अधिकारी 60 कर्मचारी, भिंगार हद्दीत 4 अधिकारी 54 कर्मचारी, शीर्घ कृती दलाचे जवान, कमांडो, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस गेल्या सहा दिवसापासून काम करत आहे. 45 पिक्स पाँईटसह गस्तीवर दिवस-रात्र बंदोबस्त सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!