Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्हा परिषद सभापती निवडी 14 जानेवारीला

जिल्हा परिषद सभापती निवडी 14 जानेवारीला

पंचायत समित्यांच्या सभापतींची आज निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या चार विषय समितींच्या सभापतिपदासाठी येत्या 14 जानेवारीला निवड होणार आहे. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राहणार आहे. सकाळी 11 ते 1 इच्छुकांना सभापती पदासाठी अर्ज दाखल करता येणार असून त्यानंतर छाननी आणि गरज असल्यास मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, आज 14 पंचायत समितींच्या सभापतीच्या निवडी होणार असून या निवडीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यातील राजकीय वातावरण गरम झाले आहे.

- Advertisement -

राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने एकत्र येत सत्ता स्थापन केलेली आहे. त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम, कृषी, समाज कल्याण आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापतींसाठी निवड होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सत्ता राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष एकत्र आलेले आहेत.

हा फॉम्युल्यानुसार प्रत्येक पक्षाच्या वाट्याला एक विषय समिती येणार आहे. फरक कोणत्या पक्षाला कोणती समिती मिळणार, कोण कोणत्या समितीसाठी आग्रही राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्षपदानंतर वजनदार समिती म्हणून अर्थ आणि बांधकाम समितीकडे पाहिले जाते. यामुळे या समितीवर काँग्रेस, शिवसेना आणि क्रांतीकारी पक्षाचा डोळा आहे. या समितीवर आपल्या पक्षाचा सदस्य असावा यासाठी खलबते सुरू आहेत.

14 जोनवारीला सकाळी 11 ते 1 या वेळेत नगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली समाज कल्याण आणि महिला कल्याण समितीसह विषय समिती एक आणि विषय समिती दोन वरील सभापतींची निवड करण्यात येणार आहे. या निवडी झाल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होऊन विषय समिती एक आणि दोनवर विजयी झालेल्या सभापतीपैकी एकाला अर्थ आणि बांधकाम तर दुसर्‍या सभापतीची कृषी समितीचे सभापती म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

आज 14 पंचायत समित्यांमध्ये सभापती निवडी करण्यात येणार आहे. आपल्या पक्षाच्या सभापती व्हावेत, यासाठी तालुक्या तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी ऐनवेळी अडचण नको, गट नोंदणी करण्यात आली आहे. पंचायत समिती सभापती निवडीनंतर जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती सभापती निवडून येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शालीनीताई विखे यांच्या अध्यक्षपदाच्या काळात काँग्रेसकडे अध्यक्षपद तर अर्थ बांधकाम समिती ही राष्ट्रवादीच्या वाट्याला होते. यासह समाज कल्याण समिती देखील त्यांच्याकडे होती. तर काँग्रेसकडे महिला बालकल्याण आणि कृषी समिती होती. आता फॉम्युला बदला जाणार असल्याने कोणाच्या वाट्याला काय येणार यावर खलबते सुरू झाली आहेत.

राजकीय पक्षाची डोकेदुखी वाढणार
अर्थ बांधकाम समितीवर सर्वाचा डोळा असल्याने सर्व राजकीय पक्षाची डोकदुखी वाढणार असून वेळप्रसंगी या समितीसाठी निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारी म्हणून मुंबईतून अर्थ-बांधकाम समितीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या