Friday, April 26, 2024
Homeनगरझेडपीत बायोमेट्रिक हजेरी बंद

झेडपीत बायोमेट्रिक हजेरी बंद

कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपाय राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेने पुढील काही दिवस बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून याची अमंलबजाणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने देखील कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होईपर्यंत काही कालावधीसाठी जिल्हा परीषदेची बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद करावी अशी मागणी केली होती. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह जिल्हा परिषदेत येणार्‍या लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून बायोमेट्रिक प्रणाली बंद करण्यात आली आहे.

मढीत व्यावसायिकांना फटका

सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीचा परिणाम श्री क्षेत्र मढी यात्रेवरही झाला. दरवर्षीच्या तुलनेत भाविकांची संख्या कमी असल्याने त्याचा फटका यात्रेतील व्यावसायिकांना बसला आणि कोट्यवधींची उलाढाल हजारांवर आली. दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी दर्शन होताच लगेच माघारी जाणे पसंत केल्याने मढीची यात्रा फुललीच नाही. तसेच नियमितपणे भरणारा गाढवांचा बाजार तिसगाव येथे भरविण्यात आल्याने या बाजारातही मोठी उलाढाल झाली नाही.

- Advertisement -

जिल्ह्यातील शाळांची स्नेहसंमेलने स्थगित; प्रार्थनाही मैदानावर न होता वर्गात होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांची होणारी स्नेहसंमेलने आगामी 15 दिवस स्थगित करण्यात आल्याची माहिती झेडपीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी दिली. सध्या मार्च महिना असल्याने अनेक शाळांनी स्नेहसंमेलने आयोजित केली होती. पण सरकारने गर्दी होईल असे कार्यक्रम रद्द करावेत असा आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता ही स्नेहसंमेलनेही स्थगित करण्यात आली आहेत. राहाता तालुक्यातील दाढ, तसेच आंबी येथील शाळांचे स्नेहसंमेलन स्थगित करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर देण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या