Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

उबर इट्सची मालकी आता झोमॅटोकडे

Share

मुंबई :

उबर कंपनीने त्यांचा खाद्यपदार्थ घरोघरी पोहोचवण्याचा उद्योग झोमॅटो कंपनीला विकला आहे. झोमॅटोने ही घोषणा केली आहे.. झोमँटोने उबर इट्सला 35 करोड डॉलर म्हणजे 2500 करोड रुपयांना खरेदी केली आहे. उबरकडे सध्या फक्त 9.9 टक्के शेअर आहे. कँब सर्व्हिस देणारी उबर कंपनी ऑनलाइन खाद्यपदार्थ सर्व्हिसमध्ये चांगला व्यवसाय होत नव्हता, त्यामुळेच कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

उबर इट्स आणि झोमँटो या दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहारामधून उबर इट्सचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्याचबरोबर उबर इट्सला आपल्या सर्व ग्राहकांचा डेटा झोमँटो हस्तांतरित करणार आहे.

उबर इट्सकडे सध्या जे कर्मचारी आहेत. ते मात्र झोमँटोकडे जाणार नाहीत. सध्या उबर इट्सकडे 100 कर्मचारी आहेत. यापैकी काही जणांना कामावरून काढून टाकले जाईल तर काही जणांना उबरच्या इतर सेवांमध्ये सामावून घेतले जाईल. याविषयी झोमँटोने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

झोमँटोचे संस्थापक दिपिंदर गोयल म्हणाले, उत्कृष्ट हॉटेलची माहिती ग्राहकांना पुरवण्याचे आणि पाचशेहून अधिक शहरांकडे फूड डिलिव्हरीचे काम आम्ही करतो आहोत. आता उबर इट्स आमच्याकडे आल्यामुळे या क्षेत्रातील आमचे स्थान अधिक बळकट होण्यास मदत होईल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!