Type to search

Featured नाशिक

वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढोलीचे घवघावीत यश

Share

ञ्यंबकेश्वर :

आज ञ्यंबकेश्वर तालुक्यातील कोटंबी येथे झालेल्या अध्यक्ष चषक तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान व मोठ्या गटाचे विजेतेपद वाढोली शाळेने मिळवले. जिल्हा परिषद नाशिक मार्फत अध्यक्ष चषक स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी करण्यात येते.

 लहान गटातून कु. काजल बंडू महाले (इ. 5वी) हिने स्वच्छ शाळा, सुंदर शाळा या विषयावर बोलून ञ्यंबकेश्वर तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळवला तर मोठ्या गटातून कु.रोहित जयराम मोरे (इ. 7वी) याने मला शास्ञज्ञ व्हायचय या विषयावर बोलून प्रथम क्रमांक मिळवला. हे दोन्ही जि. प. शा. वाढोलीचे विद्यार्थी नाशिक येथे होणाऱ्या अध्यक्ष चषक स्पर्धेत जिल्हास्तरासाठी ञ्यंबकेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील.

वाढली शाळेचे मुख्याध्यापक

भा.ल.पवार यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अमृत जगदाळे, अमोल नरवटे, दिलीप पवार, शञुघ्न उबरहंडे, छाया ठोके, चिञा नाडेकर, भाग्यश्री गांगुर्डे, स्वाती बोरकर या  सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!