Type to search

Featured नाशिक

औंढा किल्याचा चीचकूळ्या डोंगराची राजमुद्रा ग्रुपच्या युवकांनी केली चढाई

Share

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे

सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत लपलेला चीचकूळ्या डोंगराची चढाई करणे म्हणजे खूपच मुश्किल आहे मात्र पिढ्यान पिढ्यांचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील राजमुद्रा ग्रुपचे युवक दरवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने मोठ्या धाडसाने औंढा किल्याचा सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या चीचकूळ्या डोंगराची यशस्वी चढाई पूर्ण करतात.

तेथील विस्कटलेले दगड निटनेटके करने, प्लास्टिक पिशव्या गोळा करुण परिसर अगदी सुशोभित करतात. डोंगरावर असलेल्या वेताळ बाबा या जागृत देवस्थानात राजमुद्रा ग्रुपच्या वतीने आरती घेण्यात आली. तरुणांचे गडावरील स्वच्छता करण्यासाठी हात सरसावले आहेत.राज्यात राजमुद्रा परिवाराचे अनेक सदस्य असून ते या सामाजिक कार्यासाठी स्वतःला झोकून देत आहेत.

शिवाजी महाराजांनी जोपासलेल्या गडांचे अस्तित्व टिकविन्यासाठी पूर्वजानी घालून दिलेल्या परंपरा जोपासीत गेल्या अनेक वर्षापासून युवक धडपड करीत आहेत. हे सामाजिक बांधीलकेचे कार्य जोमाने सुरू आहे. कोणत्याही किल्ल्यावर अस्वच्छत्ता असल्यास तातडीने हे सर्व एकत्र येवून ती समस्या मिटवतात. मोठ्या साहसाने कितीही मोठा उंच किल्ला असला तरी त्याची यशस्वी चढ़ाई करतात.

चीचकूळ्या डोंगरावर प्राचीन कालीन चार गुफा थंड पाण्याचा एक झरा आहे. तपस्वी सर्जुदास महाराज यांनी चीचकूळ्या डोंगरावर तपस्थान केले आहे. डोंगरावर पाच ते दहा मीटरचा झेंडा युवक घेऊन जातात. या अगोदर देवस्थान सोशोभीत करण्यासाठी डोंगर कठीण असून देखील सिमेंट, वाळू खडी आदी वस्तू युवकांनी नेल्या आहेत. दरवर्षी देवस्थान परिसरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

या उपक्रमात किरण जोशी,राहुल जोशी, एकनाथ शिंदे,सागर घाडगे,संदीप आहेर,अंकुश आहेर,सागर शिंदे,जनार्धन जोशी,सोमनाथ भांगरे,मोहन मम्हळे, प्रकाश जोशी,लकी चिमटे,रामनाथ आहेर,संजय जोशी,रोहित आहेर,रोशन जोशी,वैभव जोशी,आदेश गवळे,दीपक लोटे,गणेश जोशी आदि युवक सहभागी होतात

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!