Saturday, April 27, 2024
Homeनगरयेस बँक… नो क्लिअरिंग !

येस बँक… नो क्लिअरिंग !

नगरमधील सात बँकांमधील चेकचे व्यवहार ठप्प

अहमदनगर (प्रतिनिधी) – रिझर्व बँकेने येस बँकेवर आणलेल्या आर्थिक निर्बंधांनंतर नगरमधील सात बँकांमधील चेकचे व्यवहार ठप्प झाले आहेत. येस बँक नो क्लिअरिंग’मुळे खातेदार अन् त्या बँकांही आता गुताड्यात सापडल्या आहेत. दरम्यान येस बँकेतून रक्कम काढण्यासाठी आज दुसर्‍या दिवशीही खातेदारांची गर्दी झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

गुरूवारी रात्री रिझर्व बँकेने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादले. या निर्बंधामुळे खातेदारांना महिनाभरात फक्त 50 हजार रुपयांची रक्कम काढता येणार आहे. येस बँकेमार्फत नगरमधील नामांकित सात को-ऑपरेटिव्ह बँकांचे चेक क्लिअरींग याच बँकेमार्फत होत होते. रिझर्व बँकेचे निर्बंधामुळे चेक क्लिअरींगचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

सीटीएस क्लिअरींग व्यवस्था बंद असल्याने खातेदारांना त्रास सहन करावा लागत असून या सात बँकांनी खातेदारांची दिलगिरी व्यक्त केली आहे. येस बँकेच्या व्यवहार बंधने आल्याने हा प्रकार घडला असून दोन-चार दिवसांत त्यातून मार्ग काढून पर्यायी व्यवस्था केली जाईल अशी नोटीस सात बँकांनी नोटीस बोर्डावर लावली आहे.

नगर, भिंगार, पारनेरही अडचणीत
ज्या सात बँकांचे येसमधील क्लिअरींग थांबले आहे त्यात नगर, भिंगार आणि पारनेरमधील बँकांचा समावेश आहे. तीन सहकारी आणि चार को-ऑपरेटिव्ह बँकांचे क्लिअरींग थांबल्याने खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बँक प्रशासनाने त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

एलआयसीमध्ये लागला बोर्ड…
येस बँकेवर निर्बंध आल्याने या बँकेचे कोणतेही चेक स्वीकारले जाणार नाहीत, असा बोर्ड एलआयसीच्या कार्यालयात लागला आहे. या कार्यालयावर लागलेल्या बोर्डामधून येस बँकेसोबतच शहरातील आणखी काही बँकांची नावे आहेत. या बँकांसंदर्भात माहिती घेण्यासाठी खातेदार चौकशी करताना दिसले.

- Advertisment -

ताज्या बातम्या