Saturday, April 27, 2024
Homeनगरनगर – निंबवीची यात्रा रद्द करून वर्गणीतून शाळा डिजिटल करणार ; ‘एका...

नगर – निंबवीची यात्रा रद्द करून वर्गणीतून शाळा डिजिटल करणार ; ‘एका जत्रेने देव म्हातारा होत नाही’ म्हणत ग्रामस्थांचा निर्णय

नगर – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यात्रा, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर निंबवी येथील दरवर्षी भरणारी भैरवनाथाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला असून ‘एका जत्रेने देव म्हातारा होत नाही’ अशा आशयाच्या जुन्या म्हणीचा संदेश गावात सोशल मिडियावर टाकत लोकांना या आपत्तीची जाणीव करून यात्रा रद्द करण्याचा निर्णय सांगितला जात असल्याची माहिती प्रा. सतीश शिर्के यांनी दिली आहे.

कालाष्टमीच्या मुहर्तावर निंबवी येथे मोठी यात्रा भरत असते. मात्र प्रथमच यात्रा रद्द होत आहे. ऐन यात्रांच्या हंगामातच कोरोनाने विळखा घट्‌ट केला आहे. यात्रा कमिटीने खबरदारी व शासनाच्या आदेशाचा मान राखत मानवी आरोग्याला प्राधान्य दिले असून यात्रा रद्द केली आहे. याकामी सरपंच सौ.सुरेखा शिर्के यांनी खबरदारी घेतली आहे.

- Advertisement -

आज सकाळी फक्त पुजाऱ्याच्या हस्ते अभिषेक व आरती करून मंदिर बंद केले आहे. भाविकांनी घरिच धार्मिक विधी करण्याचे आवाहन यात्रा कमिटिच्या वतीने केले असल्याची माहिती सुरेश शिंदे, सुनिल लांडे, संजय शिर्के, काकासाहेब शिर्के, विजय शिर्के यांनी दिली. आज गावात होणारा कुस्तीचा आखाडा व सर्वच धार्मिक कार्यक्रम रद्द केल्याची माहिती महाराष्ट्र केसरी पै. अशोक शिर्के, दादासाहेब गावड़े यांनी दिली आहे. गावातील प्रत्येकाने आज आपले व्हाट्सअपला डीपी व स्टेटस ठेऊनच अभिवादन केल्याचे दिसून येत आहे. यात्रेसाठी जमा केलेला निधी गावातील दोन्ही शाळा डिजिटल करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून याकामी गावचे सुपुत्र व शाळेचे माजी विद्यार्थी सध्या औरंगाबाद जिल्ह्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश गावडे पुढाकार घेणार आहेत. दरम्यान बेलवंडी पोलीस स्टेशनच्या वतीने परिसरातील गावांना याबाबत तसे पत्र देऊन पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या