Saturday, April 27, 2024
Homeनगरनीट वागा, नाहीतर ठाकरे राजीनामा देतील

नीट वागा, नाहीतर ठाकरे राजीनामा देतील

गडाखांचा काँग्रेस, राष्ट्रवादीला इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे जर नीट वागले नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील, असा सल्ला वजा इशारा अहमदनगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दिला. यामुळे राजकीय विश्लेषंकाच्या भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

नेवासा तालुक्याचे आमदार महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री चंद्रशेखर घुले यांचा नागरी सत्कार समारंभ नेवासा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे हे राजकारणी माणूस नाही, मी त्यांना जवळून पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून मी उद्धव ठाकरे यांना ओळखतो. उद्धव ठाकरे हे कलावंत कलाकार माणूस आहे, शब्द पाळणारा माणूस आहे, म्हणून मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य द्यायचं असेल, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भांडणं कमी करावीत.

उद्धव ठाकरे यांचे आभार मानावे नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर हवा फुकत बसले असते. सत्तेत आले, शहाणपणाने वागावे ग्रामीण भागातील सरकार आलेलं आहे. शहरी भागातील सरकार गेलेलं आहे. ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर कशाला तुम्हाला बंगले पाहिजेत? कशाला तुम्हाला कार्यालय थाटामाटाचे पाहिजे?, असा प्रश्न यशवंतराव गडाख यांनी विचारला.

आधी खात्यांच्या संख्येवरून, नंतर खातेवाटपावरून आणि बंगल्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वाटप केलेले बंगलेही बदलवावे लागले. इतकंच नाही, तर स्वत:कडील महत्त्वाची खातीही राष्ट्रवादीला द्यावी लागली. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मानापमान नाट्य थांबताना दिसत नाही.

यावरूनच गडाखांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कान टोचले. दुसरीकडे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसही महाविकास आघाडीच्या सरकारवर तुटून पडण्याची एकही संधी सोडत नाहीत. तीन पक्षांचं सरकार असल्यानं, सरकार चालवण्याचं आव्हान आहे, हे तर उद्धव ठाकरेंनीही मान्य केलं आहे. त्यामुळे आता हे तीन पक्षीय सरकार गडाखांचा सल्ला मानतात, की खरंच उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची वेळ येते, हे तर काळच ठरवेल.

..नाहीतर विरोधी बाकावर असता
उद्धव ठाकरे यांचे आभार मानावे नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर हवा फुकत बसले असते. सत्तेत आले, शहाणपणाने वागावे ग्रामीण भागातील सरकार आलेलं आहे. शहरी भागातील सरकार गेलेलं आहे. ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर कशाला तुम्हाला बंगले पाहिजेत? कशाला तुम्हाला कार्यालय थाटामाटाचे पाहिजे?, असा प्रश्न यशवंतराव गडाख यांनी विचारला.

- Advertisment -

ताज्या बातम्या