Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकुटुंब हाच मानवी जीवनाचा मध्यबिंदू !

कुटुंब हाच मानवी जीवनाचा मध्यबिंदू !

जवळपास सर्वच जण आपल्या कुटुंबासोबत राहतात. काही लोक त्यांच्या कुटूंबापासून जरी लांब असतील तरी कुटुंब प्रत्येकाला असते. कुटुंबात प्रत्येक जण अनेक गोष्टी समजून घेण्यास शिकतो.

संयुक्त राष्ट्राच्या महासभेने ११९३ रोजी १५ मे हा दिवस ‘कुटुंब दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सामाजिक जीवनात संयुक्त कुटुंब पद्धतीचं महत्त्व लोकांना समजावे, यासाठी या दिवसाची घोषणा करण्यात आली. जगात सर्वात पहिले १५ मे १९९५ रोजी अमेरिकेने कुटुंब दिवस साजरा केला.

- Advertisement -

हिरव्या रंगाचा गोल आणि त्यात लाल रंगात घराचे आणि प्रेमाचे चिन्ह असे या कुटुंब दिवसाचे प्रतीक चिन्ह आहे. समाजाचा केंद्रबिंदू कुटुंब असते व कुटुंबाशिवाय समाजव्यवस्था अपूर्ण आहे, असे या प्रतीक चिन्हा मधून दर्शवले आहे. भारतात देखील ‘आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस’ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनेक कंपन्यांमध्ये या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या समवेत एकत्रित साजरा केला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या