Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संपात सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा इशारा

Share
संपात सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा इशारा, Latest News Workers Straik Participant Action Hint Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाच दिवसांचा आठवडा करावा या आणि इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी येत्या 8 जानेवारी रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या या संपाला राज्य राजपत्रित महासंघाने पाठिंबा दिला आहे.

राज्य शासकीय कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात 8 जानेवारी 2020 रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. त्याची दखल सरकारने घेतली असून शासकीय-निमशासकीय कर्मचार्‍यांनी संपात सहभागी होणे ही बाब गैरवर्तवणूक समजण्यात येईल व अशा कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे.

नवी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी केंद्राप्रमाणे राज्यातही 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणीसह शासकीय कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने 8 जानेवारीला देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. तसेच त्यास राजपत्रित अधिकारी महासंघानेही पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे या संपात शासकीय-निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे. तसेच संपकाळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. विभाग प्रमुख आणि कार्यालयप्रमुखांनी संप काळात मुख्यालय सोडून जावू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!