Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवासा – नगर औरंगाबाद हायवेवर मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात

नेवासा – नगर औरंगाबाद हायवेवर मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात

नेवासा बु. (वार्ताहर ) – नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटा येथे पुणे येथून इलाहाबादकडे मजुरांना घेऊन जाणारी खाजगी बस उलटली.रविवारी पहाटे हा अपघात झाला असून यामध्ये तीन-चार मजूर किरकोळ जखमी झाले आहे.

शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पिंपरी चिंचवड येथून उत्तरप्रदेश राज्यातील इलाहाबाद कडे २६ मजुरांना घेऊन जाणारी खाजगी बस(क्र. एम.एच.१२ के.क्यू.४२६८नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे महामार्गावरील दुभाजकाला आढळून उत्तर प्रदेश ला जाणारी बस पलटी झाल्याने हा अपघात झाला लॉकडाऊन व पहाटेची वेळ असल्याने वाहनांची वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना वाचली आहे.

- Advertisement -

अपघातात किरकोळ जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेण्यात आले असून घटना स्थळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे,पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण ठोंबरे, पोलीस नाईक महेश कचे यांनी पाहणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या