Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

विवाहितेची मुलीसह आत्महत्या

Share
चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला, Latest News Shrirampur Missing Girl Dead Body Well

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील कोरेगव्हाण येथील सुमन उर्फ मीना गणेश आढाव (वय 30) व अनुजा गणेश आढाव (वय 6) या मायलेकीने 5 जानेवारी रोजी घराच्या मागील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येस भाग पाडल्या प्रकरणी दि. 6 रोजी दादासाहेब फक्कड वाळके यांच्या फिर्यादीवरून गणेश परसराम आढाव व परसराम लक्ष्मण आढाव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रीगोंदे तालुक्यातील कोरेगव्हाण येथील सुमन उर्फ मीना गणेश आढाव वय 30 हिला तिच्या सासरी तिचा नवरा गणेश आढाव व सासरा परसराम आढाव यांनी मोटारसायकल घेण्यासाठी माहेराहून 50 हजार रुपये घेऊन यावेत याबाबत वेळोवेळी मानसिक व शरीरिक छळ करून मारहाण केली जात असे. या त्रासाला कंटाळून अखेर सुमन उर्फ मीना गणेश आढाव हिने तिची 6 वर्षाची मुलगी अनुजा गणेश आढाव हिच्या सह घरामागील विहिरीत दि. 5 रोजी उडी मारून आत्महत्या केली.

या प्रकरणी मृताचे भाऊ दादासाहेब वाळके यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात आत्महत्येस भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने करीत आहेत.

दादासाहेब फक्कड वाळके, वय 32, धंदा – शेती, रा. उखलगाव, ता. श्रीगोंदा यांच्या फिर्यादी वरून आरोपी गणेश परसराम आढाव, वय 33 वर्षे परसराम लक्ष्मण आढाव, वय 71 वर्षे दोघेही रा. कोरेगव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी संगनमताने सुमन उर्फ मीना गणेश आढाव हिने मोटारसायकल चे कर्ज फेडण्यासाठी माहेरवरून 50 हजार रुपये आणावेत म्हणून तिचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तिने तिची मुलगी कु. अनुजा, हिच्यासह उडी मारून आत्महत्या केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!