संक्रातीच्या वाणाचे मडके घरासमोर फोडले; केडगावातील महिलेला मारहाण

अहमदनगर (प्रतिनिधी) – एकाने संक्रातीच्या वाणाचे मडके केडगावातील एका महिलेच्या घरासमोर फोडले. महिलेने मडके फोडल्याचा जाब विचारला असता दगडाने मारहाण केल्याची घटना केडगावत घडली आहे.

याप्रकरणी मारहाण करणारा राकेश शिंदे (रा. केडगाव) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती रावसाहेब सोमवंशी (वय- 20 रा. केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. 14) दुपारी बाराच्या सुमारास शिंदे याने फिर्यादीच्या घरासमोर संक्रातीच्या वाणाचे मडके फोडले.

यावर विचारणा केली असता, त्याचा राग आल्याने फिर्यादीला दगडाने मारहाण केली. मारहाण होत असताना फिर्यादीचे वडील सोडविण्यासाठी गेले असता, त्यांनाही शिंदे याने दगड व काठीने मारहाण केली. यापूर्वी शिंदे याने 9 जानेवारीला फिर्यादीची छेडछाड केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीसांनी राकेश शिंदे विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार इखे करत आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *