Wednesday, April 24, 2024
Homeनगरमहिला बचत गटांनी विक्री केले 5 कोटींचे मास्क !

महिला बचत गटांनी विक्री केले 5 कोटींचे मास्क !

लॉकडाऊन काळात 21 हजार महिलांच्या हाताला रोजगार

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना संसर्गामुळे एकाएकी शहरी भागात मास्कचा तुटवडा जाणवत असताना राज्यातील 34 जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी कापडी मास्क निर्मितीचे काम हाती घेतले आहे. कॉटनच्या कपड्यापासून तयार करण्यात येणारे हे मास्क सर्वसामान्यासाठी किफायतशीर ठरत असून रोज धुवून ते वापरता येणार आहेत. महिनाभरात राज्यातील 6 हजार बचत गटांनी 42 लाख 89 हजार मास्कची निर्मिती करून त्याद्वारे 4 कोटी 80 लाख 26 हजार रुपयांची उलाढाल केली आहे. यामुळे ऐन लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात ग्रामीण भागात बचत गटांतील महिलांच्या हाती काम मिळाले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात महिला बचत गटांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून वर्षभर विविध साहित्य आणि उत्पादनाची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाच्या मार्केटींगसाठी जिल्हास्तरावर मार्केटींग अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या जगभर कोरोना विषाणूचा विळखा वाढत असून कोरोनापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मास्कला मागणी आहे. अतिरिक्त मागणी आणि कमी उत्पादन्न यामुळे शहरी भागात मास्काचा काळाबाजार सुरू आहे. तर एकादा वापरून फेकून देणार्‍यात येणार्‍या (युज अ‍ॅण्ड थ्रो) मास्काच्या किंमतीत ग्रामीण भागात महिला बचत गटांनी तयार केलेल्या कॉटनच्या मास्कला मागणी वाढत आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प आहे. मात्र, मास्कची निर्मिती करणार्‍या महिलांच्या हाताला घर बसल्या काम मिळाले आहे. महिनाभरात राज्यातील 34 जिल्ह्यातील5 हजार 905 बचत गटांच्या 20 हजार 769 महिला बचत गटांनी 42 लाख 89 हजार मास्कची निर्मिती केली आहे. या मास्कच्या विक्रीतून 4 कोटी 80 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.

अशी राज्याची आकडेवारी
5 हजार 905 बचत गटातील 20 हजार 769 महिलांनी 42 लाख 89 हजार मास्कची निर्मिती केली असून त्यातील 40 लाख 12 हजार मास्कची विक्री झाली असून त्यातून 4 कोटी 80 हजार रुपयांची उलाढाल झालेली आहे.

नगर दुसर्‍या स्थानावर
नाशिक महसूल विभागात नगर जिल्ह्याने आतापर्यंत 18 लाख 800 हजार रुपयांच्या मास्कची निर्मिती केली आहे. तर सर्वाधिक विक्री नाशिक जिल्ह्याची 28 लाख रुपये आहे. धुळे जिल्ह्यात 5 लाख 27 हजार, नंदूरबार 32 हजार 530 आणि जळगाव जिल्ह्यात 12 लाख 27 हजार रुपयांच्या मास्कची विक्री झालेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या