Wednesday, April 24, 2024
Homeनगरपाणी योजनांचे हिस्ट्रीशीट एक महिन्यात तयार करा

पाणी योजनांचे हिस्ट्रीशीट एक महिन्यात तयार करा

नगर पंचायत समिती मासिक सभेत रामदास भोर यांचा आदेश

अहमदनगर (वार्ताहर) – नगर तालुक्यातील सर्व पाणी योजनांची हिस्ट्रीशीट एक महिन्यांच्या आत सादर करण्याचे आदेश माजी सभापती रामदास भोर यांनी सोमवारी (दि 17) झालेल्या मासिक सभेत दिले.

- Advertisement -

तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या आत्तापर्यत जेवढ्या योजना झाल्या आहेत, त्या सर्व योजनांची सद्यस्तिथी काय आहे, या योजनांवर आत्तापर्यंत किती खर्च झाला, योजना कार्यान्वित आहे किंवा नाही या सर्व बाबींची माहिती होण्यासाठी एक महिन्याच्या आत सर्व पाणी योजनांची हिस्ट्रीशीट सादर करण्याचे आदेश भोर यांनी सोमवारी झालेल्या सभेत दिले. यासंदर्भात सार्वमतने सोमवारच्या अंकात वृत्त प्रसारित केले होते.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाणी योजनांचा हिस्ट्रीशीट तयार करण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी झाला होता. मात्र अजूनही पाणी योजनांची हिस्ट्रीशीट तयार झालेली नसून याबाबत सार्वमत ने सोमवारच्या अंकात वृत्त प्रसारित केले होते. नगर तालुक्यातील विविध पाणी योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या योजना सुरु आहेत की बंद याबाबत माहिती घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पंचायत समिती सभापती रामदास भोर व जि. प. सदस्य संदेश कार्ले यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. परंतु यावर संबंधित अधिकार्‍यांकडून कुठलीही कारवाई झाली नाही.

कोणत्या स्कीम मधून किती योजना तयार झाल्या, त्यासाठी किती निधी वापरला गेला, या योजना सुरु आहेत की बंद या सर्व बाबीची उकल होण्यासाठी प्रशासनाने पाणी योजनांची हिस्ट्रीशीट तयार करण्या संबंधी आदेश देणे गरजेचे आहे. जर ही हिस्ट्रीशीट काढण्यात आली तर यातून बर्‍याच गोष्टी बाहेर येऊ शकतात. दरम्यान नगर पंचायत समितीने एक महिन्याच्या मुदतीत हिस्ट्रीशीट चा आदेश दिल्यामुळे संबंधित अधिकारी याची दाखल घेईल का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वीच केला प्रश्न उपस्थित
एका पेक्षा जास्त पाणी पुरवठा योजना केलेली नगर तालुक्यात भरपूर गावे आहेत. जर काही गावांमध्ये एका पेक्षा जास्त योजना झाल्या असतील तर त्या गावांना पाणी का मिळत नाही, या योजनांची सद्यस्थिती काय आहे समजणे गरजेचे असून याबाबत दोन वर्षांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जि. प. सदस्य संदेश कार्ले व मी स्वतः यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, मात्र त्यानंतर काय झाले ते समजलेच नाही.
– रामदास भोर (माजी सभापती, पंचायत समिती)

हिस्ट्रीशीटचा आदेश देणारी पहिलीच पंचायत समिती
सरकारच्या कोणत्या स्कीममधून किती रुपये खर्च झाले, त्या योजना कार्यान्वित आहेत की नाही याबाबतच्या ‘सार्वमत’च्या दणक्यामुळे नगर पंचायत समितीच्या मासिक सभेत हिस्ट्रीशीटचे आदेश देण्यात आले. या पूर्वी कुणीही असे आदेश न दिल्यामुळे हिस्ट्रीशीटचा आदेश देणारी ही जिल्ह्यातील पहिलीच पंचायत समिती ठरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या