Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

ईव्हीएमबद्दलची शंका मतदाराला पडणार महागात; तक्रार खोटी ठरल्यास खावी लागणार जेलची हवा

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) हे मशीन जोडले जाणार आहे. यामुळे ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या व्हीव्हीपॅटच्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत 7 सेकंदासाठी दिसणार आहे. जर ‘मतदान केलेल्या पक्षाचे चिन्ह व्हीव्हीपॅटवर दिसले नाही’, ‘दुसऱ्याच उमेदवाराचे अथवा पक्षाचे चिन्ह त्याच्यावर दिसले’ अशी तक्रार मतदाराने केल्यास आणि ती तक्रार खोटी ठरल्यास त्याला दंडात्मक कारवाईसह जेलची हवा खावी लागणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर सुरु केल्यावर देशभरात या यंत्राच्या कार्यप्रणालीबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहेत. ईव्हीएम यंत्र हॅक करून निकाल बदलेले जातात असा आरोप लोकसभा निवडणुकीनंतर सर्रासपणे केला जात होता. हि यंत्रे सुरक्षित असून व त्याद्वारे होणारी निवडणूक पारदर्शी असल्याने निवडणूक आयोगाने वारंवार स्पष्ट केले आहे.

मात्र लोकांच्या मनात असणाऱ्या शंकाना निकाली काढण्यासाठी लोकसभेच्या गेल्या निवडणुकीप्रमाणेच आतादेखील विधानसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट वापरले जाणार आहे. एखाद्या मतदाराने मतदानावेळी या व्हीव्हीपॅटवर आक्षेप नोंदवला आणि ‘ज्या उमेदवाराला मत दिले त्या उमेदवाराचे चिन्ह व्हीव्हीपॅटवर न दिसता दुसऱ्याच उमेदवाराचे चिन्ह दिसले,’ अशी तक्रार केली तर त्या तक्रारीची दखल संबंधित केंद्रस्तरीय मतदान अधिकारी घेणार आहेत .

संबंधित मतदाराला त्याचे मतदान करतेवेळी खरोखरच असा प्रकार घडला आहे का,याची विचारणा हे अधिकारी करतील. जर मतदार त्या तक्रारीवर ठाम असेल तर त्या मतदाराकडून एक अर्ज भरून घेतला जाणार आहे. या अर्जामध्ये जर मतदार खोटे बोलत असेल तर 6 महिने शिक्षा अथवा 1 हजार रुपये दंड होऊ शकतो या नियमाची माहिती असणार आहे. हा अर्ज त्या मतदाराच्या स्वेच्छेने भरून घेतल्यावर त्याला न्हा ‘टेस्ट व्होट’ची संधी दिली जाणार आहे.

मात्र यावेळी त्याच्यासोबत केंद्रस्तरीय मतदान अधिकारी, मतदान केंद्रावरील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि साक्षीदार उपस्थित असतील. जर ‘टेस्ट व्होट’व मध्ये मतदार खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जागेवरच पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. या प्रकरणात संबंधित मतदाराला सहा महिन्यांची कैद अथवा 1 हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.

विविध निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मशीनमध्ये ‘सेंटिंग’ केलेली आहे. त्यामुळे अमुक उमेदवार विजयी झाला, कोणत्याही उमेदवारासमोरचे बटन दाबले तरी ठराविक पक्षाच्या उमेदवाराला मत मिळते असे अनेक आरोप करण्यात आले होते. काही जणांनी याविषयीच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल केल्या होत्या.

तसेच अनेकजण न्यायालयात देखील गेले होते. या पार्श्‍वभूमीवर कोणाला मतदान केले याची माहिती मतदाराला मिळण्यासाठी व्हीव्हीपॅटवर दिलेले मत प्रिंट स्वरूपात दिसण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. यामुळे मतदान प्रक्रियेविषयी कोणतीही शंका राहणार नसल्याचा दावा आयोगाच्या सूत्रांनी केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!