Friday, April 26, 2024
Homeनगरनातेवाईकांना सहारा ठरेल राजकीय कोंडमारा

नातेवाईकांना सहारा ठरेल राजकीय कोंडमारा

हिंगणगाव ग्रामपंचायत व सुरक्षा समितीचा ठराव

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनाचा संकट जाईपर्यत बाहेरगावातून आलेल्या नातेवाईकाना राजकीय पुढार्‍यानी घरात आश्रय दिला तर पाच वर्ष निवडणूक लढवू देणार नाही. तसेच आधार देणार्‍या नागरिकांना सहा महिने ग्रामपंचायतीच्या सर्व सुविधांपासून वंचित रहावे लागेल, असा निर्णय हिंगणगाव ग्रामपंचायत व ग्राम सुरक्षा समितीने घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी जाधव सरपंच आबासाहेब सोनवणे यांनी दिली.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सुरक्षतेच्या दुष्टीने हा निर्णय घेतला या बाबत ठरावही घेण्यात आला. नगर तालुक्यात रेड झोनमधून येणार्‍या नागरिकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रात्री-आपरात्री नागरिक घरी येतात. शाळेत क्वारंटाईन न होता नातेवाईकांच्या घरी राहतात. नगर तालुक्यात चारजण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व रेड झोनमधून आलेले आहे. तालुक्यात मुंबई-पुणे येथून येणार्‍या नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. आरोग्य विभाग, ग्रामसुरक्षा समितीला आल्याची माहीत होऊ नये यासाठी अनेकजण घरात लपून बसत आहे.

राजकीय पुढारीही या नातेवाईकांना आश्रय देत असल्याचे प्रकार नगर तालुक्यात घडत आहे. या राजकीय पुढार्‍यांमुळे तालुक्यात कोरोनाची लागण वाढू शकते. काही नातेवाईकही रेड झोनमधून येणार्‍या नागरिकांना आधार देत आहे. गावाचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी हिंगणगव येथील ग्रामपंचायत व ग्रामसुरक्षा समितीने महत्वाचा ठराव घेतला आहे.

नगर तालुक्यात सोसायटी व ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. रेड झो मधून येणार्‍या नागरिकांना राजकीय पुढार्‍यानी आश्नय दिला तर येणार्‍या निवडणुकीपासून वंचित रहावे लागणार आहे. निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयातून देण्यात येणार नाही. कागदपत्रे नसल्यामुळे निवडणूक लढवता येणार नाही तसेच गावातील नागरिकांनी रेड झोनमधून येणार्‍या नागरिकाना आधार दिला तर सहा महिने ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात येणार्‍या सर्व सुविधा बंद करण्यात येईल. त्यासाठी बाहेरगावाहून आलेल्यांना आश्रय देऊ नये, असे आवाहन सरपंच आबासाहेब सोनवणे यांच्यासह ग्रामसुरक्षा समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

नगर तालुक्यात रेड झोनमधून येणार्‍या नागरिकांमुळेच कोरोनाची लागण होत आहे. हिंगणगाव ग्रामपंचायत घेतलेल्या निर्णयाला प्रशासनाने मदत करावी. संपूर्ण तालुक्यासाठी असा नियम लागू करावा. यामुळे नगर तालुका कोरोनापासून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनालाही सहकार्य होणार आहे.
– आबासाहेब सोनवणे, सरपंच हिंगणगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या