Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

हल्लेखोर वाळूमाफिया महसूलमंत्र्यांचे बगलबच्चे

Share

थोरातांवर विखे यांचा निशाणा

लोणी (प्रतिनिधी)-  महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाळू माफियांचेच वर्चस्व असून त्यांनीच हे वाळू माफिया निर्माण केले आहेत. आपल्या बगलबच्च्यांना पाठीशी घालण्याच्या धोरणामुळेच वाळू माफिया महसूलच्या अधिकार्‍यांवर हल्ले करत आहेत, असा थेट आरोप भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी केला.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळूतस्करी सुरू आहे. या विरोधात कारवार्ई होत नाही. दुसरीकडे महसूलच्या अधिकार्‍यांवर वाळूमाफिया हल्ले करीत आहेत, याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून विखे थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांवर निशाणा साधला.

संपूर्ण राज्यातच वाळू माफियांकडून महसूल अधिकार्‍यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. मात्र, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. महसूलमंत्री गप्प आहेत. वाळूमाफियांच्या विरोधात कोणतेही धोरण घेतले जात नसल्यामुळेच एक प्रकारे वाळु माफीयांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असून महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातच वाळु माफीयांना संरक्षण मिळत आहे.

महसूल मंत्री स्वत: आपल्या बगलबच्चांना पाठीशी घालतात. यामुळे महसूल मंत्र्यांच्या तालुक्यासह राज्यभर वाळू माफियांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!