Wednesday, April 24, 2024
HomeनगरVideo# : ऐतिहासिक अहमदनगरमध्ये शिवजयंती उत्साहात

Video# : ऐतिहासिक अहमदनगरमध्ये शिवजयंती उत्साहात

अहमदनगर (प्रतिनिधी) – शिवरायांची महती सांगणारे पोवाडे, भगवे झेंडे सोबतीला ढोल-ताश्यांचा गजर, छत्रपतींचा जयघोष करत निघालेली मिरवणूक अशा उत्साही वातावरणात नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. शहरासह भिंगार, सावेडी, केडगाव उपनगरात तसेच प्रत्येक घरोघरी भगवे झेंडे लावून श्रीमंत योगींच्या जन्मोत्सवाचा निनाद नगरात घुमला.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप, माजी खा. दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिवसभरात छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था संकुलाच्या मिरवणुकीत जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था, न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, रेसिडेन्शियल कॉलेज, न्यू लॉ कॉलेज, रेसिडेन्शियल हायस्कूल, राष्ट्रीय पाठशाला, छत्रपती शिवाजी महाराज इंजिनीअरिंग कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिवप्रहार संघटना यांच्यासह विविध शाळा, संघटना सहभागी झाल्या होत्या.

- Advertisement -

मिरवणुकीच्या अग्रभागी रेसिडेन्शियल हायस्कूल शाळेच्या मुला-मुलींचे झांज पथक, झेंडा पथक, रिबिन पथक, ट्रॅक्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, आम्ही लेकी सावित्रीच्या. विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी चौकाचौकांमध्ये गर्दी केली. माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट मार्गे मिरवणुकीचा न्यू आर्ट्स कॉलेज येथे समारोप झाला. शहर पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, जिल्हा मराठाचे नंदकुमार झावरे, जी. डी. खानदेशे, अ‍ॅड. विश्वास आठरे, रामचंद्र दरे, प्राचार्य बी. एच. झावरे, उपमहापौर मालन ढोणे, संजीव भोर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

मुस्लिम समाजाच्यावतीने स्वागत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा प्रारंभ पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांच्याहस्ते झाले. यावेळी पुणे विद्यापिठाचे माजी सिनेट सदस्य शिवाजी साबळे, हामजा चुडीवाला, नईम सरदार, जुनेद शेख, अकलाख शेख, संतोष गोयल, राजू साखला, योगेश बेंद्रे, नवीद शेख आदींसह मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकजागृतीशिवजयंतीच्या मिरवणुकीत मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड, मराठा प्रगती संघ, शिवप्रहार आदींसह विविध संघटना या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. फुलांनी सजवलेले रथ, शिवरायांची आकर्षक मूर्ती, झांजपथक, ढोलपथक या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. मिरवणुकीत अहमदनगर महापालिकेचे लोकजागृती अभियान, शिक्षण हक्क कायदा जागृती फलकाचा रथ सहभागी झाला होता.

मिरवणुकीवर पुष्पवृष्टी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर चितळे रोड मित्र मंडळाच्या वतीने फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी व बिस्किटचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, मंडळाचे अध्यक्ष शुभम झिंजे, माजी नगरसेवक संजय झिंजे, अरुण खिची, शकुर शेख, बाबासाहेब चौधरी, श्रीराम येंडे, सागर शिंदे, शुभम शिंदे, ऋषीकेश क्षीरसागर, निलेश रोकडे, राजू चौधरी, बाळाची गौरी, वसंत गुगळे, नयना चायल, लहू कराळे, प्रशांत ढलपे, अमोल कांडेकर, अक्षय घोरपडे, साधना बोरुडे, रंजना उकिर्डे, जंगम देवा, नलिनी गायकवाड, रजनी ताठे, श्रीदेवी आरगोंडा, सिंधूताई कटके, सुनीता बागडे, जरिना पठाण, अरुणा गोयल आदी उपस्थित होते.

‘कोतवाली’ची दादागिरी
मिरवणूक माळीवाडा वेशीजवळ आली. तेथे एका शाळेचे विद्यार्थी नृत्य करत होते. त्यावेळी तेथे असलेल्या कोतवालीच्या साहेब असलेल्या अधिकार्‍याने ‘पुढे चला थांबू नका’ अशी दादागिरीची भाषा वापरत विद्यार्थी व शिक्षकांना दम भरला. त्यावेळी तेथे उपस्थित असणारे शिवप्रहार संघटनेचे प्रमुख संजीव भोर यांनी त्या साहेबाला याचा जाब विचारला. दोघांत वाद वाढत असल्याचे दिसताच तेथे उपस्थित असणार्‍या डीवायएसपी संदीप मिटके यांनी हस्तक्षेप करत वाद होण्यापूर्वीच त्यावर पडदा टाकला.

व्हिडिओ- अर्जुन राजापुरे

- Advertisment -

ताज्या बातम्या