Sunday, April 28, 2024
Homeनगरवावरथमध्ये शेतात तोफगोळ्याने पडले खड्डे

वावरथमध्ये शेतात तोफगोळ्याने पडले खड्डे

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील मुळा धरणाच्या पलिकडील वावरथ गावातील हांडाळवाडी येथे शेतात तोफगोळा पडून मोठे खड्डे पडले आहे. तोफगोळा पडल्यानंतर मोठा कानठळ्या बसविणारा आवाज झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. ही घटना काल गुरुवारी (दि.16) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

वावरथ गावापासून सुमारे 10 ते 15 किमी दूर असलेल्या के.के.रेंजमधील सराव सुरू असताना हा तोफगोळा की बंदूकीची गोळी शेतात येऊन पडल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. या घटनेची खबर माजी सरपंच ज्ञानेश्वर बाचकर यांनी राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना दिली आहे. दरम्यान, तहसीलदार शेख यांनी या घटनेचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविणार असल्याची माहिती बाचकर यांनी दिली.

- Advertisement -

काल दुपारी मोठा आवाज झाला. या आवाजामुळे वावरथ येथील हांडाळ वस्तीवरील ग्रामस्थ घाबरून गेले. आवाजाच्या दिशेने गेलेल्या ग्रामस्थांना एका कांद्याच्या शेतात पाचइंच व्यासाचे खोल खड्डे पडल्याचे आढळून आले आहे. मात्र, खड्डे किती खोल आहे? याबाबत ते बघायला कोणाचेही धाडस झाले नाही. के.के.रेंजच्या सिमेपासून दूर तब्बल 10 किमी अंतरावर हा गोळा येऊन पडला असल्याचे बाचकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या