Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

मी माझे शब्द मागे घेतो – वारीस पठाण

Share
मी माझे शब्द मागे घेतो - वारीस पठाण, Latest News Varis Pathan Statement Behind

मुंबई – आम्ही 15 कोटी 100 कोटींवर भारी पडू असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमच्या वारिस पठाण यांनी केले. यानंतर त्यांच्यावर चहोबाजुनी टीकेची झोड उठली.

माझे वक्तव्य कोणत्या धर्माविरोधी नव्हते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी माझे शब्द मागे घेतो असे म्हणत त्यांनी म्हटले आहे. फक्त 100 लोक या देशात असे आहेत की जे मुस्लीम समाजाविरोधात आहेत, अशा भाजप, आरएसएस, बजरंग दल या संघटनांच्या 100 लोकांविरोधात मी ते वक्तव्य केलं होतं,अशी सारवासारव पठाण यांनी केली.

मी माझे शब्द परत घेतोय, मी देशाचा सच्चा नागरिक आहे. मी सच्चा भारतीय मुस्लीम असून या महान देशावर माझं प्रेम आहे. मुस्लिमांचा संविधानावर विश्वास आहे,फ असं वारिस पठाण म्हणाले. पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले असले तरीही या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही.

दरम्यान पठाण यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!