Wednesday, April 24, 2024
Homeनगरवांजोळी येथून दीडशे ब्रास खडी चोरी प्रकरणी तिघांना अटक

वांजोळी येथून दीडशे ब्रास खडी चोरी प्रकरणी तिघांना अटक

खडीसह एक जेसीबी व दोन डंपर जप्त; आरोपी परिसरातीलच

सोनई (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील वांजोळी येथून गेल्या महिन्यात चोरीस गेलेल्या 3 लाख रुपये किंमतीच्या दिडशे ब्रास खडीचा व आरोपींचा तपास लावण्यात सोनई पोलिसांनी यश आले असून पोलिसांनी चोरीस गेलेल्या या खडीसह खडी भरण्यासाठी वापरलेला जेसीबी व वाहतुकीसाठी वापरलेले दोन डंपर असा 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लोहगाव येथील तिघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील वांजोळी येथून 21 मार्च 2020 रोजी 3 लाख रुपये किंमतीची दिडशे ब्रास खडी चोरीस गेली होती. खडी एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीस जाणे शक्य नव्हते. जेसीबी व डंपरचा वापर झाल्याचे स्पष्ट होते.

सोनई येथील भाऊसाहेब सोपान सोनवणे यांनी खडी चोरीची फिर्याद दिल्याने सोनई पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय मोहन गावडे, हवालदार संजय बाबुराव चव्हाण, पोलीस नाईक शिवाजी नामदेव माने, कॉन्स्टेबल विठ्ठल पोपट थोरात व कॉन्स्टेबल गणेश कुंडलिक आढागळे यांचे पथक करत होते.

गुन्ह्याचा कौशल्याने व कसोशीने तपास करून गुप्त बातमीदाराकडून बातमी काढून गुन्ह्यातील आरोपी विजय एकनाथ पवार (वय 29) रा. शिंगवे तुकाई, सतीश शिवाजी खंडागळे (वय 28) रा. वांजोळी व ज्ञानेश्वर बाळासाहेब पटारे (वय 28) रा. पटारे वस्ती लोहगाव यांना अटक करून त्यांच्याकडून खडी भरण्यासाठी वापरलेले जेसीबी मशीन (एमएच 16 एएम 6899) व दोन डंपर क्र. एमएच 17-एजी 0211 व एमएच 04 एयू 7143 व चोरी गेलेली खडी असा एकूण 19 लाख 60 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या