Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

…तरच व्हॅलेंटाइन !

Share
...तरच व्हॅलेंटाइन !, Latest News Valentine Day News Ahmednagar

नकार पचविण्याची क्षमता असेल तरच साजरा करा…

अहमदनगर (प्रतिनिधी) – तरुणाईसाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस आदी सणापेक्षा काही कमी नाही. फेब्रुवारी सुरु होताचं तरुणाईला वेध लागतात ते ‘व्हॅलेंटाइन डे’चे. आपल्या प्रिय व्यक्तीला गिफ्ट्स, ग्रीटिंग कार्ड्स, चॉकलेट्स, टेडी देवून प्रत्येकाला प्रेम व्यक्त करायचे असते. त्यासाठी नगरमधील बाजारपेठही व्हॅलेंटाइन स्पेशल साहित्याने सजल्या आहेत. ‘नकार पचविण्याची हिम्मत असेल तरच ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करा’, असा सूर आता तरूणांमधूनच निघत असल्याने ते दिलासादायक म्हणावे लागेल.

शहरातील कापडबाजार, माणिक चौक, माळीवाडा, न्यू आर्टस कॉलेज रोड, चितळे रोड, सावेडी, प्रोफेसर कॉलनी चौक, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, सदर बाजार आदी भागात असणार्‍या दुकानांत वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स, ग्रीटिंग कार्ड्स, चॉकलेट्स, टेडी आदी भेटवस्तूं विक्रीसाठी आल्या आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त आपल्या प्रिय व्यक्तीला हटके गिफ्ट्स खरेदी करण्याला तरुणाई पसंती देत आहे.

दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गिफ्ट्स, ग्रीटिंग कार्ड्स यांच्या किंमतीमध्ये फार वाढ झाली नाही. त्यामुळे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे व्यवसायिक सांगतात. प्रेमवीरांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’चे निमित्त मिळणार आहे. अनेक जण प्रेम व्यक्त करण्यासाठी याची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. ‘व्हॅलेंटाइन डे’चे सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात होताच प्रेमाचा रंग तरुणाईवर चढला आहे.

‘व्हॅलेंटाइन डे’ला आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी गिफ्ट, गुलाबाचे फुल देऊन प्रेमाची कबुली देणे, प्रियकर अथवा प्रेयसीबरोबर लाँग ड्राइव्हला जाणे, एखाद्या छान हॉटेलमध्ये डिनर घेणे असे प्लॅन असतात. नगरमध्येही व्हॅलेंटाइनच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. कॉलेजच्या कट्ट्यापासून ते सिनेमा थिएटरपर्यंत, शहरातील उद्यानापासून ते कॅफेपर्यंत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह युवक-युवती ‘व्हॅलेंटाइन डे’ सेलिब्रेट करत आहेत.

आवडत्या व्यक्तिला देण्यासाठी म्युझिकल ग्रिटिंग्ज, लव्ह चॉकलेट, फोटोफ्रेम, लव्ह कोटेशन बुक, हार्टशेफ फोटोफ्रेम, चॉकलेट रोझेस, चॉकलेट ग्रिटींग, लायटिंग व म्युझिकल डोन, कपल शो पीस, कपल स्टॅच्यू, क्रिस्टल आइटम, परफ्यूम, कॅन्डल्स, ज्वेलरी आयटम, कटलरी अशा वस्तूंना पसंती दिली जात आहे.

व्हॅलेंटाइन सप्ताहात तरुणांमध्ये खूप उत्साह असतो. वर्षभर ज्यांच्यासाठी झुरतात, त्यांना ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. परंतु नकार पचवण्याची हिंमत असेल तरचं व्हॅलेंटाइन डे साजरा करावा. नकाराचा मोठ्या मनानं स्विकार केला पाहिजे. तसं आपण ‘व्हॅलेंटाइन डे’ आपल्या आई, वडिल, बहिण, भाऊ, मित्र, मैत्रीण यांच्यासोबतही साजरा करू शकतो.
– प्रशांत जाधव, विद्यार्थी, न्यू आर्ट्स कॉलेज

टेडी, किचेन अन् म्युझिकल कार्ड…
बाजारात व्हॅलेंटाइन स्पेशल गिफ्ट्स, ग्रीटिंग कार्ड, हार्ट शेपमधील फोटो फ्रेम, टेडी, चॉकलेट बुके, हार्ट शेप फ्रेम, मग, हार्ट शेप किचेन, विविध आकारांतील चॉकलेट, ज्वेलरी सेट आदी भेटवस्तू तसेच म्युझिकल ग्रीटिंग कार्डला यंदा चांगली पसंती मिळत आहे. वीस रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या या भेटवस्तू आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!